बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने घेतली 11 कोटींची कार!

बंगळुरू | काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या 14 आमदारांपैकी एक असणारे एमटीबी नागराज यांनी खरेदी केलेल्या कारमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रोल्स राॅयस फॅन्टम VIII ही तब्बल 11 कोटींची कार त्यांनी खरेदी केली आहे. टॅक्स भरल्यानंतर या अलिशान कारची किंमत आणखी वाढू शकते.

एवढी महाग गाडी घेणारे ते कर्नाटकातले पहिले आमदार आहेत. मात्र त्यांच्या या कार खरेदीने कर्नाटकात तितकंस आश्चर्य वाटलं नाही कारण ते भारतातल्या श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत.

एमटीबी नागराज यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याकडे एक हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती असल्याची घोषणा केली होती.

काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी नागराज यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. नागराज हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

एमटीबी नागराज यांची फेसबुक पोस्ट-


महत्वाच्या बातम्या-

-‘ही’ अभिनेत्री उचलणार पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी

-कौतुकास्पद! गावातील तरूणांनी शहिदाच्या पत्नीला नवं घर दिलं बांधून

-पूरग्रस्तांना गायी, म्हशी आणि बैलजोड्या द्या; महेश लांडगेंचं गणेश मंडळांना आवाहन

-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे

-रायगडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More