‘भारतातील, बेरोजगारी, महागाईला औरंगजेबच जबाबदार असेल’; ओवैसींचा मोदींना टोला
नवी दिल्ली | देशातील वाढत्या महागाई, बेरोजगारी आणि इंधनाच्या वाढत्या किमतीवरुन एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. मुघल, औरंगजेब आणि ताजमहाल बांधणारे वाढत्या महागाई, बेरोजगारी आणि इंधनाच्या वाढत्या किमतीसाठी जबाबदार असतील, ओवैसी म्हणालेत.
प्रचारसभेत बोलताना ओवैसी यांनी डिझेल 102 रुपये लिटर झालं असेल तर नक्कीच यासाठी मोदी नाही तर औरंगजेब जबाबदार असेल असे म्हणाले. जर भारतात तरुण बेरोजगार असतील, महागाई आकाशाला भिडत असेल, आणि पेट्रोल, डिझेलच्या किंमती रोज वाढत असतील तर त्याला औरंगजेब जबाबदार आहे मोदी नाही. तरुणांकडे नोकरी नाही यासाठी बादशहा अकबर जबाबदार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या त्याला ताजमहाल बांधणारे जबाबदार आहेत, असं ते म्हणालेत.
जर शहाजहानने ताजमहाल बांधला नसता तर, पेट्रोल 40 रुपयांना मिळालं असतं, असं ओवैसी म्हणाले. ताजमहाल, लाल किल्ला बांधून त्यांनी चुक केली. ते पैसे त्यांनी वाचवायला पाहिजे होते. आणि 2014 नंतर मोदी आल्यानंतर त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे होते असं ओवासी म्हणाले. यावेळी भाजप सरकार प्रत्येक गोष्टीसाठी मुघल आणि मुस्लिमांना जबाबदार धरत असल्याचंही ते म्हणाले.
पुढे बोलताना ओवैसी म्हणाले, भाजपला फक्त मुघल आणि पाकिस्तान दिसतात. भारतातील मुसलमानांंनी पाकिस्तानचा संदेश नाकारला आहे. भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षात असून मुसलमान कधीच आपली मातृभूमी सोडणार नाही. तुम्ही कितीही घोषणा केल्या तरी आमचे भारतावर प्रेम आहे. आणि आम्ही भारत कधीच सोडणार नाही. आम्ही भारतातच शेवटचा श्वास घेणार.
देश में महंगाई, बेरोज़गारी, और बढ़ती पेट्रोल-डीज़ल की कीमतों का ज़िम्मेदार @narendramodi नहीं, मुग़ल हैं😜 – Barrister @asadowaisi https://t.co/KLDrUaOwMz
— AIMIM (@aimim_national) July 4, 2022
थोडक्यात बातम्या –
“शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल”
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती समोर
शिवसेनेला आणखी एक झटका?; शिवसेना खासदाराच्या पत्राने टेन्शन वाढलं
सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला
‘मंत्रीपदाची संधी मिळाली तर…’; विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.