रिलायन्स जिओची घोषणा, फुकट मिळणार स्मार्टफोन

मुंबई | रिलायन्स जिओच्या स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन फुकट मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली.

१५ ऑगस्टपासून हा फोन बाजारात येणार असून २४ ऑगस्टपासून या फोनसाठी नोंदणी करता येईल. जिओ फोनवर अवघ्या १५३ रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.

दरम्यान, फोन फुकट असला तरी १५०० रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. जी ३ वर्षांनी ग्राहकांना परत मिळेल.