मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी
नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकारणात एकिकडे मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उद्योगक्षेत्रातून देखील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून पायउतार झाले आहेत. तर आता पंकज मोहन पवार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. रामलिंग सिंह गुजराल आणि के व्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हा नवा निर्णय 27 जूनपासून लागू झाला आहे. तर मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी यांच्याकडे देखील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आकाश अंबानींची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही काळात रिलायन्स जिओ कंपनीने यशाचे नवे शिखर गाठले आहे. मुकेश अंबानी यांनी 2021 मध्येच कंपन्यांची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपवली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर आज रिलायन्स जिओ इन्फोकॅमकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मी काही त्यांची ट्रॅव्हल एजंट नाही’, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले…
‘जे नाव एकनाथने दिलं त्याला विरोध नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
भाजपच्या गोटात हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
“राज ठाकरेंनी कारकूनाला ‘सामना’चं संपादक बनवलंय, हे त्यांनी विसरू नये”
Comments are closed.