अनिल अंबानींच्या पावलावर पाऊल? मुकेश अंबानींना बसला ‘इतक्या’ हजार कोटींचा झटका!

mukesh ambani suffers loss of 75 thousand crores

Mukesh Ambani | काही वर्षांपूर्वी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले अनिल अंबानी (Anil Ambani) पुन्हा एकदा व्यवसायात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रिलायन्स समूहातील (Reliance Group) कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अंबानी यांना अवघ्या पाच दिवसांत तब्बल ७५ हजार कोटी रुपयांचे नुकसान (Loss) झाले आहे.

अनिल अंबानी यांना एकेकाळी व्यवसायातील ग्लॅमरस नाव (Glamorous Name) म्हणून ओळखले जात होते. मात्र, कर्जाच्या बोजामुळे त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. एका क्षणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, मुकेश अंबानी यांनी वेळीच मदत केल्याने हे संकट टळले. त्यानंतर अनिल अंबानी यांनी अनेक कंपन्यांचे कर्ज फेडले आणि सेबीकडून (SEBI) शेअर बाजारात (Share Market) पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी मिळवली. मात्र, अल्पावधीतच त्यांच्या कंपनीचे शेअर्स घसरले. आता असाच काहीसा फटका मुकेश अंबानी यांना बसला आहे.

पाच दिवसांत ७५ हजार कोटींचा फटका

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजही (Reliance Industries) याला अपवाद ठरली नाही. या घसरणीमुळे रिलायन्स कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) तब्बल ७५ हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. केवळ रिलायन्सच नाही तर एलआयसी (LIC), एसबीआय (SBI) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या बाजार भांडवलातही मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल १,२५,३९७.४५ कोटी रुपयांनी घटले. (Mukesh Ambani)

कोणत्या कंपनीला किती फटका बसला?

सध्या फक्त रिलायन्स समूहाच्या नुकसानीबद्दल माहिती समोर आली आहे. इतर कंपन्यांच्या नुकसानीबद्दल, म्हणजे एलआयसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या घसरणीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  (Mukesh Ambani)

Title: mukesh ambani suffers loss of 75 thousand crores

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .