बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात ‘संधींची त्सुनामी’- मुकेश अंबानी

नवी दिल्ली | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. मुकेश अंबानी यांनी ईओआय 2020 या पुरस्कार सोहळ्यात संबोधित करताना तोे बोलत होते. यावेळी अंबानींनी खाजगीकरणावरही भाष्य केलं.

मी जेव्हा आज आणि उद्याचा भारत जेव्हा पाहतो त्यावेळी उद्योजकांसाठी संधींची त्सुनामी आल्याचं दिसून येतं. मला हा विश्वास दोन कारणांमुळे आला आहे. पहिला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या भविष्यातील विकासात खासगी क्षेत्रांच्या भूमिकेचं स्वागत करतात. तर दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञानाची उपलब्धता असल्याचं मुकेश अंबानी म्हणाले.

या तंत्रज्ञानाचा वापर करून 1.3 अब्ज भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात. गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी देशाच्या विकासात खासगी क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं समर्थन केलं होतं. खासगी क्षेत्राला वाईट म्हणण्याची संस्कृती ही अयोग्य आहे. येत्या दशकात जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी होण्याची क्षमता आपल्यात असल्याचा विश्वासही अंबानींनी व्यक्त केला.

दरम्यान, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, जीवशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान सारख्या नव्या क्षेत्रांमध्ये त्यासोबतच शेती, उद्योग आणि सेवा या क्षेत्रात बदल होणाऱ्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याचं अंबानी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती- पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय’; ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही- रमेश चेन्निथला

निकिता तोमर हत्याकांडाचा निकाल; एकाची निर्दोष मुक्तता तर दोघांना दिली ‘ही’ शिक्षा

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More