बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन तयार, पहिल्यांदाच केला शेअर

मुंबई | नवीन टेक्नॉलॉजीमुळे मानवाने ज्या गोष्टींचा विचार केला त्या सत्यात उतरवल्या. मात्र याचा निसर्गावरही परिणाम होत आहे. त्यासोबतच जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हा आपलाच नाही तर सगळ्या जगापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याचे अनेक दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. यावर एक उपाय आहे तो म्हणजे हरित ऊर्जेची निर्मिती हा होय. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

2030पर्यंत 100 GW एवढ्या अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करणारे प्लांट्स तयार करण्याच लक्ष्य असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ठरवलं आहे. येत्या काळात सौर ऊर्जानिर्मिती हे महत्त्वाचं असणार आहे. स्मार्ट मीटरचा वापर सौरऊर्जानिर्मितीला साह्य होईल. कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी ग्रीन हायड्रोजन महत्त्वाचं असल्याचं मुकेश अंबानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

येणाऱ्या तीन वर्षांमध्ये हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं नियोजन आहे. ऊर्जानिर्मितीत भारत आत्मनिर्भर बनेल आणि काही वर्षांतच हायड्रोजनच्या किमती घटतील, अशी अपेक्षाही अंबानींनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मी आपणा सर्वांना आश्वासन देतो की रिलायन्स या दशकाच्या समाप्तीपूर्वी हे ध्येय वेगाने साध्य करेल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘देशात 8.5 टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे’; राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर टीका

कोरोना आणि गणेशोत्सवाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले

बेळगावच्या जनतेला संजय राऊतांनी केलं ‘हे’ आवाहन, पाहा व्हिडीओ

ईडीची ‘त्या’ छापेमारीवरून अजित पवार माध्यमांवर भडकले; म्हणाले…

‘सर फक्त एवढीच विनंती आहे की…’; कल्पिता पिंगळेंनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More