मुंबई | नुकतंच ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये महाभारत मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र मुकेश खन्ना या शोमध्ये नव्हते आणि यामगील कारणंही त्यांनी सांगितलं आहे.
मुकेश खन्ना ट्विट करत म्हणाले, या पेक्षा वाईट कोणताही शो वाटत नाही. या शोमध्ये डबल अर्थाचे विनोद केले जातात. शोमध्ये पुरुषांना महिलांचे कपडे परिधान करायला देतात आणि लोक पोट धरुन हसातात.
अरूण गोविल ज्यांना देश रामाच्या भूमिकेत पाहत आहे त्यांना तुम्ही विचित्र प्रश्न कसा विचारु शकता. अरुणच्या जागी मी असतो तर कपिलचं तोंड बंद केलं असतं. म्हणून मी जात नाही, असंही खन्ना पुढे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
हाथरस जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून चौकशी व्हावी- प्रियंका गांधी
खळबळजनक! पोलिस स्टेशनसमोरच भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
“संघाचं नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं नाही”
“गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता, पण…”