बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे- मुकेश खन्ना

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे.

इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे, असं म्हणत मुकेश खन्ना यांनी मुंबई पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

अर्णब यांच्यासोबत पोलिसांनी जे वर्तन केलं ते निंदनिय आहे. समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीवर असे आरोप करणं चुकीचं आहे. या क्षणी संपूर्ण देश अर्णब यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा दावा मुकेश खन्ना यांनी केलाय.

दरम्यान, पोलिसांनी असं वर्तन का केलं? याचं उत्तर आज संपूर्ण देश मागत आहे, असं म्हणत मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

गोव्यात आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक!

“300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही”

…त्यामुळे इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार- उद्धव ठाकरे

“किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकून उद्धव ठाकरेंनी वडिलांसारखी हिंमत दाखवली”

“…तर भाजपने मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More