Top News महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना

मुंबई | कृषी कायद्याविरोधात गेले कित्येक दिवस शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार जातीने लक्ष देत नसल्याने आंदोलन चालूच आहे. शेतकरीही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेते मुकेश खन्ना यांनी या परिस्थितीला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांच्या त्याच समस्या आहेत. गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिलं. त्याऐवजी त्यांनी खेड्यांना सक्षम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसल्याचं मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.

मी भाजपला पाठींबा देतोय असं लोकांना वाटत पण हे खोटं आहे. मी कायम शेतकऱ्यांच्या बाजुने उभा असल्याचं खन्ना यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, नेहरूंनी शहरीकरणाला प्राधान्य दिलं नसतं तर बिहार आणि झारखंडची तरूण मुलं रोजगारासाठी गेली नसतीत, असंही खन्ना यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”

मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील

कोहलीच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी- गौतम गंभीर

“इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जास्त बाऊ करु नका, त्याऐवजी…”

नाईट कर्फ्यूच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक नाराज; शरद पवारांची घेणार भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या