बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा ‘शक्तिमान’लाही फटका! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्नांच्या घरातील व्यक्तिचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली | कोरोनाने सध्या संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला असून वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांसह राजकारणी, अभिनेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, दिग्गज व्यक्तीही धोरणामुळे मृत्त पावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच ‘शक्तिमान’मुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते मुुकेश खन्ना यांच्या घरातील एका व्यक्तिचं कोरोनाने निधन झालं आहे.

कोरोनामुळे मुकेश खन्ना यांनी एकुलती एक बहिण गमावली आहे. बहिणी कमल कपूर यांना शेवटपर्यंत आयसीयू बेड मिळाला नाही आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यासंदर्भात त्यांनी स्वत: पोस्ट करत माहिती दिली आहे.

‘काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूचे सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र मला अजिबात अंदाजा नव्हता की एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले़ तिच्या निधनामुळे मी हादरून गेलोय. माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 12 दिवस तिने कोरोनाशी लढा दिला होता. मात्र लन्ग्स कन्जेक्शनमुळे आम्ही तिला कायमचे गमावून बसलो. समजत नाही देव कोणता हिशोब चुकता करतोय? आज मी पहिल्यांदा आयुष्यात हादरलो असं, मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या बहिणीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिने कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र तरीसुद्धा त्यांना श्वास घ्याला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी आयसीयू बेडच्या शोधात होतो. मात्र शेवटपर्यंत तिला बेड नाही मिळाला आणि तिने आज अखेरचा श्वास घेतला. बहिणीचे अंत्यदर्शनही मी घेऊ शकलो नसल्याचं मुकेश खन्ना म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

लाईव्ह शो चालू असताना झाला बॉम्बब्लास्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खळबळजनक! पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह बेपत्ता महिलेचा आढळला मृतदेह

“ठाकरे सरकार करीना कपूर, कतरिना आणि दिशा पटानी यांच्याकडून पैसे देऊन ट्विट करून घेतात”

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांपर्यंत पगार

म्युकरमायकोसिस संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More