“मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ मग आम्ही कोण?”; तृतीयपंथीयांचा सवाल

Mukhyamantri Ladki Bahin Yojana | लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा महिलांच्या हिताचा आहे. महिलांसाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी योजना राबवल्या आहेत. यामध्ये सर्वात अधिक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा आहे. याच योजनेचा अर्ज महिला करताना दिसत आहेत.

तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी सरकार वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार आहेत. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्प हा महिलांसाठी बोनस ठरला आहे. मात्र सर्व काही महिलांसाठी योजना दिल्या जात असल्याने आता तृतीयपंथीय देखील सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’, मग आम्ही कोण? असा सवाल आता तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जाहीर झाली आहे. तृतीयपंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा, आम्ही देखील समाजाचा घटक आहोत, आम्हाला देखील मतदानाचा अधिकार आहे, असं म्हणत तृतीयपंथीयांनी देखील या योजनेचा लाभ द्यायला हवा, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मग आम्ही कोण?

मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण आहे मग आम्ही कोण? असा सवाल जालना येथील तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. आम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा अशी मागणी जालन्यातील तृतीयपंथीयांनी केली. आम्ही देखील समाजाचे घटक आहोत. आम्हाला देखील मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला ही योजना का लागू होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

योजनेत झाले बदल

जर सरकारने तृतीयपंथीयांसाठी या योजनेची घोषणा केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा तृतीयपंथीयांनी सरकारला दिला आहे. दरम्यान या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. पाच एकर शेती असणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 60 वर्षांपर्यंत असणाऱ्या महिलांचे वय हे 65 करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

News Title – Mukhyamantri Ladki Bahin Yojana On Transgender Community Statement Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना गांजा तस्करीत अटक; नेमकं प्रकरण काय?

“मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड बोलायचं, नंतर..”; जरांगे पाटलांचा खासदार कोल्हे यांच्यावर हल्लाबोल

भर पावसाळ्यात ‘या’ शहरात पाणीटंचाईचे चटके; नागरिकांनो पाणी जपून वापरा!

“राज्याचे गृहमंत्री युजलेस”, संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले खडेबोल

“मी बॉलिवुड अभिनेत्रीशी..”; क्रिकेटपटू कुलदीप यादवने लग्नाबाबत अखेर सोडलं मौन