मोठी बातमी! ”या’ योजनेअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार ‘इतके’ रुपये

Mukhyamantri Yojnadut l राज्य सरकार राज्यातील नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. सध्या या योजनेचे अर्ज भरण्याचे काम सुरु आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात राबवली ‘मुख्यमंत्री योजनादूत’ योजना :

राज्य सरकारने राज्यातील तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत ही योजना राबवली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारच्या या योजनेअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार देखील करावा लागणार आहे. तसेच राज्य सरकार या कामांसाठी पुढील 6 महिन्यात तब्बल 50 हजार युवकांची नेमणूक देखील करणार आहे. तसेच या तरुणांना दरमहा प्रत्येकी 10 हजार रुपये इतके मानधन देखील दिले जाणार आहे.

Mukhyamantri Yojnadut l योजनेचा लाभ घेण्यासाठी अट काय आहे? :

याशिवाय या सर्व 50 हजार युवकांना मुख्यमंत्री योजनादूत असे संबोधले जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच तरुणांना दिलेले कामकाज शासकीय सेवा म्हणून गृहीत देखील धरले जाणार नाही. या योजनेसाठी तब्बल 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.

सरकारने राबवलेल्या या योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी 1 मुख्यमंत्री योजनादूत म्हणून व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे. तसेच शहरी भागात देखील प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 व्यक्तीची नेमणूक केली जाणार असल्याचे आदेश सरकारने काढले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे य योजनेसाठी अर्जदार तरुण हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच त्या उमेदवाराचे वय देखील 18 ते 35 वय वर्ष असणे आवश्यक आहे.

News Title : Mukhyamantri Yojnadut Karyakram Yojana

महत्त्वाच्या बातम्या-

नागपंचमीच्या दिवशी ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, तुमच्या आयुष्यात येणार नाही संकट!

विनेश फोगाटला भारतरत्न आणि खासदारकी मिळणार? ‘या’ पक्षाने केली मागणी

या दोन राशींची होणार चांदी; गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ 2 राशींना मिळणार पैसाच पैसा

क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

‘काल ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी खेळण्याआधी…’; बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत