मुंबई | अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशीच ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली होती. 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’चा पहिला अंक काढण्यात आला होता.
विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी हे वर्तमानपत्र काढण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक सहाय्य केलं होतं. त्यांनी 2500 रुपये डाॅ. आंबेडकरांना दिले होते. बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या पाक्षिकाची सुरुवात केली होती.
मागासलेल्या वर्गाच्या उद्धारासाठी तसेच त्यांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या योजनांवर उहापोह करण्याची गरज पहिल्याच संपादकीयमध्ये डाॅ. आंबेडकरांनी बोलून दाखवली होती. हे वर्तमानपत्र त्यासाठी उपयोगी ठरेल, असंही ते यामध्ये म्हणाले होते.
दरम्यान, बाबासाहेबांनी 1924 बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरु केले होते. त्यानंतर 1928 मध्ये समता, 24 फेब्रुवारी 1930 रोजी जनता तर 4 फेब्रुवारी 1956 रोजी प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांची सुरुवात केली होती. या वृत्तपत्रांद्वारे बाबासाहेबांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत करण्याचं काम केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार आहेत- राधाकृष्ण विखे पाटील
अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…
महत्वाच्या बातम्या-
“राजेंद्र आज असा नटलाय, लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता”
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग
“नागरिकत्व कायदा आणून सरकारने महात्मा गांधींची इच्छा पूर्ण केली”
Comments are closed.