Mukta Barve | अनेक मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री यांचं वय हे चाळीशी पार झालं आहे. मात्र त्यांनी अद्यापही विवाह केला नाही. मनोरंजन विश्वामध्ये बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला देखील अनेकदा असे प्रश्न विचारले जातात. त्यावर तो नेहमी ठोस प्रतिक्रिया देणं टाळतो. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेला (Mukta Barve) विवाहाबाबत प्रश्न केला. त्यावर तिने उत्तर दिलं आहे.
मुक्ता बर्वेचं (Mukta Barve) सध्या वय हे 45 आहे. मात्र तिने अजूनही विवाह केला नाही. मुक्ता बर्वे तिच्या चित्रपटांना, मालिकांना आणि नाटकांना घेऊन नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. मुक्ताने मुंबई पुणे मुंबई, नाच गं घुमा, लग्न पहावे करुन, डबल सीट यांसारख्या सिनेमांमधून काम केलं आहे. तसेच गेल्या काही वर्षांआधी तिने सुप्रसिद्ध जोगवा या सिनेमात काम केलं होतं. त्यामध्ये तिचे आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांचे इंटिमेंट सीन पाहायला मिळाले.
जोगवा या सिनेमाने मराठी चित्रपटाची परिभाषा बदलून टाकली होती. आजही त्या चित्रपटाबाबत अनेक चित्रपट रसिक आणि चित्रपट अभ्यासक चित्रपटाचे कौतुक करतात. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर जोगवाने आपलं नाव कोरलं आहे. तसेच त्यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) देखील पाहायला मिळत होती.
मुक्ताने स्वप्नील जोशी, उमेश कामत, अंकुश चौधरी या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. ऑनस्क्रिन या जोड्या मुक्तासोबत प्रेक्षकांना तितक्याच भावतात. मात्र खऱ्या आयुष्यात तिने जोडीदार निवडला नसल्याचं पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींना देखील लग्न कधी करणार या प्रश्नापासून सुटका मिळत नाही. यावर आता मुक्ताने आपलं उत्तर दिलं आहे.
मुक्ता अजून सिंगल का?
मुक्ता लग्न कधी करणार? असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारला असता तेव्हा तिने उत्तर दिलं, ती म्हणाली की, मी सध्या आनंदी आणि सुखी आहे. मी जितकी आनंदी आणि जितकी सुखी आहे त्याहून अधिक आनंदी आणि सुखी ठेवणारा कोणी असेल तर मी लग्न करेल असं उत्तर मुक्ता बर्वेनं (Mukta Barve) दिलं आहे.
मुक्ता बर्वेचे सिनेमे
मुक्ता बर्वेने मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई २, मुंबई पुणे मुंबई ३, जोगवा, लग्न पहावे करून, डबल सीट, स्माईल प्लीज, मंगालाष्टक वन्स मोअर यांसारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलं आहे. सध्या मुक्ता बर्वेचं चारचौघी हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांना पसंतीस पडत आहेत.
News Title – Mukta Barve Why Still Single At The Age 45 Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
“ऑडिशन चांगलं झालं, पण नंतर कॉम्प्रमाईजसाठी..”; शर्मिष्ठा राऊतने सांगितला वाईट अनुभव
पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून!, दिवसा-ढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा
सुंदर आणि टवटवीत त्वचेसाठी व्हिटॅमिन C समृद्ध फळे खा!
‘जे मस्तीत वागतात त्यांची मस्ती…’; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर