मुंबई | विधानपरीषदेच्या निवडणुकीला काहीच तास बाकी राहिले आहेत. यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीने कंबर कसून तयारी देखील केली आहे. यातच भाजप आमदार मुक्ता टिळक या आजारी असून देखील निवडणुकीसाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान पक्षाला माझी गरज असून पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात आहे, अस माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या.
भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाकडून आपल्या आमदारांची काळजी घेेेेेेेेेेेेेेेेेेेेतली जात आहे. भाजप आमदारांना ताज हॅाटेल तर महाविकास आघाडी आमदारांना ट्राययडंट हॅाटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. शिवाय कोणत्याही पक्षाचे मतदान बाद होऊ नये यासाठी तालीमही घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
एक मत किती महत्वाचं आहे हे आमदारांना वारवांर सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी आजारपण असून देखील आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जाधव मतदानासाठी आले होते. राज्यासभा निवडणूक विजयाचं श्रेय पक्षाने दोघांना दिलं होतं.
दरम्यान, आजही पक्षाला माझी गरज असून मी मुंबईला जात आहे, असं मुक्ता टिळक म्हणाल्यात. या सगळ्या प्रयत्नानंतर विधानपरिषदचा निवडणुकीचा काय निकाल लागेल बघणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
‘सदाभाऊंच्या जीवाला धोका आहे असं वाटत नाही पण..’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
“कैद्यांनाही मतदानाचा अधिकार मग आमच्या मलिकांना आणि देशमुखांना का नाही?”
नीरज चोप्राचा सोनेरी विजय, केला आणखी एक अप्रतिम पराक्रम
Monsoon Update| राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
एकनाथ खडसे आणि राम शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
Comments are closed.