बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याच्या महापौर म्हणतात, मोदींच्या सभेसाठी आम्ही झाडं कापली नाहीत फक्त फांद्याच कापल्या!

पुणे |  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमध्ये होणार आहे. त्यांच्या या सभेसाठी महाविद्यालयाच्या मैदानावरची झाडं तोडली गेली आहेत. यासंबंधी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना याबाबत विचारलं असता मोदींच्या सभेसाठी आम्ही झाडं कापली नाहीत फक्त फांद्याच कापल्यात, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

17 ऑक्टोबरला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सभेसाठी एस. पी कॉलेज मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

सप महाविद्यालयाचा परिसर हा कसबा विधानसभा मतदारसंघात येतो आणि मुक्ता टिळक स्वत: कसबा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना या वृक्षतोडीबाबत माहिती कसं नाही? असे सवाल आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव ही झाडं कापली जात असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी परवानगीदेखील घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More