मुंबई | पुण्यातील कसब्याच्या भाजप(BJP) आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. गुरूवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून त्या स्तनांच्या कर्करोगाशी(Breast Cancer) झुंज देत होत्या. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळं पुण्यामध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
आता आपण स्तनाच्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊयात. स्तनाच्या आकारात बदल होणं, स्तनाच्या त्वचेत बदल जाणवणं, स्तनावर पुरळं येणं, खाज सुटणं तसेच स्तनावर वेदना होणं, ही लक्षणे प्रामुख्याने स्तनाच्या कर्करोगाची दिसू शकतात.
लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता लवकरात लवकर उपचार घेणं आवश्यक आहे. कारण लवकर उपचार सुरू केल्यानंतर हा कर्करोग बराही होऊ शकतो.
तसेच या कर्करोगापासून लांब राहण्यासाठी दररोज व्यायाम किंवा योगा केला पाहीजे. आहारात हंगामी फळे तसेच हिरव्या भाज्या असल्या पाहीजेत. तसेच धूम्रपान, मद्यपान टाळले पाहीजे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती काळजी घ्या.
महत्वाच्या बातम्या-