टूथपेस्टमध्ये आढळल्या सोन्याच्या साखळ्या, अधिकारीही चक्रावले

मुंबई | टूथपेस्टमधून सोन्याची तस्करी करणाऱ्यांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय. अल्ताफ हुसेन गुलाम शब्बीर आणि कंदाथी मोहम्मद रफी अशी या दोघांची नावं आहेत. 

मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु असताना हुसेनवर संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याच्याकडील टूथपेस्टमध्ये ७ लाखाच्या ४ सोन्याच्या साखळ्या आढळून आल्या. 

तर रफीकडे तांब्याच्या तारा आढळल्या. त्यांची तपासणी केल्यावर त्या सोन्याच्या असून त्यांना तांब्याचा मुलामा दिल्याचं स्पष्ट झालं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या