High tide marine drive - मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसणं जीवावर बेतलं, तरुणीचा मृत्यू
- महाराष्ट्र, मुंबई

मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसणं जीवावर बेतलं, तरुणीचा मृत्यू

मुबंई | लाटेने समुद्रात ओढल्याने मरिन ड्राईव्हवर बसलेल्या तरुणीचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. प्रीती श्रीकृष्ण पिसे असं या तरुणीचं नाव आहे. 

प्रीती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत मरिन ड्राईव्हवर फिरायला आली होती. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसली असताना आलेल्या मोठ्या लाटेने तिला समुद्रात ओढून नेले.

मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र तिला वाचवण्यात पोलिसांना अपयश आलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा