मुंबई-पुणे भिडणार, आयपीएलचं विजेतेपद महाराष्ट्रात राहणार

Photo- BCCI

बंगळुरु | आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी मुंबई आणि पुण्याचे संघ आमनेसामने असतील. बंगळुरु झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा ६ गडी राखून दारुण पराभव केला. त्यामुळे यंदा आयपीएलचं विजेतेपद महाराष्ट्रात राहणार हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर कोलकात्यानं अवघ्या १०७ धावा केल्या. मुंबईने ४ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. मुंबईच्या कर्ण शर्मानं 16 धावांत ४ तर बुमरानं ७ धावांत ३ फलंदाज बाद केले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या