मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी, मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा

मुंबई | स्वाईन फ्लूमुळे भायखळ्यातील दाऊद हॉस्पिटलमध्ये एका १८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय. यंदाच्या वर्षी स्वाईन फ्लूमुळे मुंबईत झालेला हा पहिलाच मृत्यू आहे, त्यामुळे मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

गेल्या वर्षी मुंबईत स्वाईन फ्लूचे फक्त 3 रुग्ण आढळले होते. मात्र यावर्षी मुंबईत स्वाईन फ्लूचे २१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, राज्यात स्वाईन फ्लूमुळे यंदाच्या वर्षी १६५ जणांचा मृत्यू झालाय.