धक्कादायक! एअर इंडियाच्या चालू विमानातून एअर होस्टेस खाली पडली…

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून एअर होस्टेस खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. 

विमानानं रनवेवर धावण्यास सुरुवात केली, त्यावेळी दरवाजा लावताना तोल गेल्यानं ही एअर होस्टेस रनवेवर पडल्याची माहिती आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं याबाबत ट्विट केलं आहे. 

संबंधित एअर होस्टेस गंभीर जखमी असल्याचं कळतंय. तिला उपचारांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दुर्घटनेनंतर विमानाचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. एअर इंडियाने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | महिला प्रगतीसाठी शॉर्टकट वापरतात; भाजपच्या महिला आमदाराची मुक्ताफळं

-घरपोच दारु देण्याचा कुठलाही विचार नाही; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

-आयुषमान खुरानाच्या कॅन्सरग्रस्त पत्नीलाही आला #MeToo चा धक्कादायक अनुभव

-पुतळे उभारणे, त्यांच्या उंचीवरून भांडण्यातच आपल्याला समाधान- पुरंदरे

-शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात; सामनातून भाजपवर निशाणा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या