प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई विमानतळ ‘या’ दिवशी 6 तास राहणार बंद, गैरसोय होण्यापूर्वी ही बातमी पूर्ण वाचा

Air Travel Fare Hike

Mumbai Airport | रेल्वेप्रमाणेच आता विमान प्रवास करणाऱ्यांनाही ब्लॉकचा फटका बसणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 9 मे रोजी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल 6 तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी उड्डाणे आणि लँडिंग प्रभावित होणार आहेत. (Mumbai Airport)

6 तासांचा ब्लॉक जाहीर

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असून येथे दररोज शेकडो उड्डाणं आणि आगमन होतात. अशा स्थितीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धावपट्ट्यांच्या देखभालीसाठी वार्षिक नियोजनात हा ब्लॉक घेतला जातो. यावर्षी 9 मे 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत धावपट्ट्यांची तपासणी व दुरुस्ती केली जाणार आहे.

या दरम्यान, विमानतळावरील 09/27 आणि 14/32 या दोन्ही मुख्य धावपट्ट्या बंद राहतील. त्यामुळे कोणतेही विमान त्या वेळेत लँडिंग किंवा टेक-ऑफ करू शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या वेळा तपासून योग्य नियोजन करावं, असा सल्ला अधिकृतरीत्या देण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

विमानतळ प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विमान कंपन्यांना या नियोजित ब्लॉकबाबत 6 महिने अगोदरच सूचना देण्यात आली होती, जेणेकरून त्या आपली वेळापत्रकं योग्य प्रकारे आखू शकतील. प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी कंपन्यांनी पर्यायी उड्डाणांची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात धावपट्टीवर पाणी साचू नये, घसरटपणा टाळावा आणि विमाने सुरक्षीतपणे लँडिंग करू शकतील यासाठी ही देखभाल अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी 9 मेच्या प्रवासाच्या आधीच अपडेट तपासणं आणि आवश्यक असल्यास पर्याय निवडणं गरजेचं ठरणार आहे.

Title : Mumbai Airport Shut for 6 Hours on May 9

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .