पुणे | कोरोनाग्रस्तांचा आकडा हा प्रत्येक दिवशी वाढताना दिसून येत आहे. मुंबईतमध्ये आज दुपारी एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे तर पुण्यातल्या पिंपरी-चिंचवडमध्ये देखील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर अधिक विस्तृतपणे भाष्य केलं. पिंपरी चिंचवडमधला कोरोनाग्रस्त हा अमेरिकेवरून आला होता. त्याने मुंबईवरून पुणे असा प्रवास केला आहे. अधिक माहिती घेणं चालू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईत आणि महाराष्ट्रात आज कोरोनाने पहिला बळी घेतला. त्यानंतर मृताच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, राज्यातला कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 40 वर पोहचला आहे. यामध्ये पुण्यात एकूण 17 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुंबईत लोकल सेवा तर पुण्यात बस सेवा बंद करण्याचा विचार शासन करत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानवरही कोरोनाचा ‘अॅटॅक’, घेतला पहिला बळी तर 184 जणांना कोरोनाची लागण
कोरोनाने रेल्वेची चेन ओढली…. डेक्कन, प्रगती, हावडा, दुरांतो एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द!
प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण?
Comments are closed.