बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापरे! करोना होऊन बराही झाला; मुंबईकरांना कळलंही नाही!

मुंबई | शहरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. शहरातील कोरोना बाधितांची आकडेवारीही छातीत धडकी भरवणारी आहे. बहुतांश मुंबईकरांना कोरोना होवून गेलाय मात्र 36 टक्के लोकांना याची जाणीवही झाली नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. एका खासगी प्रयोगशाळेनं केलेल्या अँटीबॉडी चाचणीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका खासगी प्रयोगशाळेच्या चाचणी दरम्यान अनेक लोकांच्या शरिरात अँटीबॉडीज तयार झाल्याचं आढळून आलं. याचा अर्थ या लोकांना आपल्याला कोरोना होऊन गेला आहे याची माहितीही झाली नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15%, घाटकोपरला 36.7%, सांताक्रुजला 31.45% तर बांद्रा पश्चिमेला 17% जणांना कोरोना इन्फेक्शन होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेनं मुंबईत अशा 1 लाख चाचण्या करुन कोरोनाचा वास्तववादी अहवाल मांडावा असं मागणी करणार पत्रही त्यंनी आयुक्तांना दिलं आहे.

मुंबईतील कोरोना संक्रमणाची सद्यस्थिती अचूकपणे समजण्यासाठी किमान एक लाख लोकांची चाचणी करण्यासाठी पालिकेने तातडीनं पावले उचलावीत. महापालिकेनं सर्व सार्वजनिकआणि खासगी प्रयोगशाळांमधून उपलब्ध अँटीबॉडी डेटा संकलित करुन याची माहिती मुंबईकरांना करुन देण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोनापासून वाचण्यासाठी ‘या’ गावकऱ्यांनी 50 पेक्षा जास्त मुलांना पाजली चक्क देशी दारू!

कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवणारच; राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरवर दरेकर यांची टीका

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोलेंना कोरोनाची लागण

ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे, कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही- एकनाथ शिंद

अखेर ठरलं! ‘या’ देशात होणार आयपीएलचा 13वा सीजन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More