बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

कल्याण | मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत फूटपाथवर आढळले होते.

काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनकर यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होतं.

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला गेले होते. फडणवीस यांनी त्यांच्या उपचारासाठी भाजपकडून दहा लाखाच्या मदतीची घोषणा केली होती.

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशीपर्यंत पोहोचवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

“आकडे जेवढे वाढतील, तेवढं लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ; विरोधकांना सत्ता नसल्याने अपचन”

अगोदर लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं, राजकारणाला भरपूर वेळ पडलाय- आदित्य ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे पाटील

‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींंचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More