मुंबईत ‘या’ तारखेदरम्यान फटाके आणि रॉकेट फोडण्यावर बंदी!

Mumbai News

Mumbai Firecracker Ban | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 11 मेपासून 9 जून 2025 पर्यंत फटाके फोडणे आणि रॉकेट उडवणे यावर बंदी घातली आहे.

मुंबई पोलिसांकडून इशारा :

या काळात कोणतीही स्फोटके, फटाके किंवा इतर ध्वनी व प्रकाश निर्माण करणाऱ्या वस्तूंचा वापर केल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Mumbai Firecracker Ban)

मुंबईत सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सीमेवरील तणाव, ऑपरेशन सिंदूरसारख्या घडामोडी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Firecracker Ban | नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे

या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे किंवा रॉकेट उडवणे टाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. (Mumbai Firecracker Ban)

News Title: Mumbai Bans Firecrackers and Rockets from May 11 to June 9 Amid India-Pakistan Tensions

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .