बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वन मॅन आर्मी! एकटा पोलार्ड चेन्नईला पडला भारी, मुंबईचा चेन्नईवर 4 गड्यांनी विजय

मुंबई | चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समधील सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. हातातून निसटलेल्या सामन्यात पोलार्डने वन मॅन आर्मीप्रमाणे धमाकेदार खेळी करत चेन्नईच्या हातातील सामना जिकंला. चेन्नईची खराब फिल्डिंगही त्यांच्या पराभवाला जबाबदार ठरली.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात मुंबईच्या ट्रेंड बोल्डने गायकवाडला बाद करत पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर आलेल्या मोईन अलीने जोरदार फटकेबाजी केली. मोईनने 36 चेंडूत 58 धावांची खेळी केली यामध्ये 5 षटकार आणि 5 चौकार होते. त्याला बुमराहने बाद केलं. सोबत फाफही फलंदाजी करत होता त्यानेही अर्धशतक केलं.

त्यानंतर फाफला आणि रैनाला पोलार्डने बाद केले. मुंबईकडे सामन्याची पकड आली असं वाटत असताना चेन्नईच्या अंबाती रायडूने 27 चेंडूत 72 धावांची खेळी केली. या खेळीत रायडूने 7 षटकार मारले.

चेन्नईच्या 219 धावांचा पाठलाग करताना मुंबईने सावध केली होती. रोहित 35 आणि डिकॉक 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमारही अवघ्या 3 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आलेल्या पोलार्डने हंगामा केला. षटकारांचा पाऊस पडत होता. पोलार्डने 34 चेंडूत 84 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 षटकार आणि 6 चौैकार ठोकले आणि विजयाचा शिल्पकार ठरला.

थोडक्यात बातम्या- 

‘पैशासाठी आम्ही पगडी घालत नाही’; पंजाबच्या हरप्रीतचा अक्षय कुमारला टोला

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

“बड्या राजकीय हस्तींनी मला…”; लंडनला गेलेल्या अदर पुनावालांचा धक्कादायक खुलासा

मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय कराल?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढताय?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More