ढाका | मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा खेळाडू मुस्तफिजुर रेहमानला बांगलादेश क्रिकेट बाेर्डाने 2 वर्षे विदेशी टी-20 सामने खेळण्यास बंदी घातली आहे.
2 वर्षांपासून सतत दुखापतग्रस्त होत असल्याने महत्वाच्या मालिकांमध्ये त्याला बांगलादेशकडून सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे बांगला क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
3 वर्षांच्या कारकिर्दीत तो फक्त 10 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळला आहे. या बंदीमुळे आयपीएलच्या 2 मोसमांसाठी त्याला खेळता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या–
-कोहली आणि धोनीचा हा खास फलंदाज पुनरागमनासाठी सज्ज
-अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत
-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा
-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल