बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकांचा धुरळा उडणार; 236 प्रभागांसाठी ‘या’ दिवशी आरक्षण सोडत होणार जाहीर

मुंबई | राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार शुक्रवारी दि. 29 जुुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर सभागृह वांद्रे, मुंबई येथे आगामी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation Election 2022) निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरी मागास वर्गीय आणि महिला आरक्षित प्रभागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावर दि. 2 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत.

नागरी मागास वर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षणाचा वाद आणि खटला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) असल्याने थोडा काळ या कामांना स्थगिती मिळाली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न निकालात काढत ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नागरी मागास वर्गासाठी (OBC) 27% आरक्षण देण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभागांमध्ये निवडणूका होणार आहेत. नागरी मागास वर्गासाठी (OBC) 236 जागांपैकी 63 जागा आरक्षित होणार आहेत. यापैकी 32 जागा नागरी मागास वर्गाच्या महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. या निवडणुकांत 155 जागा खुल्या प्रवर्गासाठी (Open Category) असणार आहेत. प्रभाग आरक्षण सोडत काढल्यानंतर 30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. दि. 13 ऑगस्ट अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबईच्या एकूण 1 कोटी 24 लक्ष 42 हजार 373 लोकसंख्येपैकी अनुसूचित जातींची (Schedule Caste) लोकसंख्या 8 लक्ष 3 हजार 236 आहे तर अनुसूचित जमातींची (Schedule Tribes) 1 लक्ष 29 हजार 653 आहे. तसेच मुंबईतील प्रभागांची सरासरी लोकसंख्या 52 हजार 722 आहे. एकूण प्रभागांपैकी महिलांसाठी (Women Reserved) राखीव 118, अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2, ओबीसींसाठी 63 आणि खुल्या प्रवर्गात 156 जागांसाठी निवडणूका होणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही’; बंडखोर आमदाराने उद्धव ठाकरेंना सुनावलं

न्यूड फोटोशूट करणं अभिनेता रणवीर सिंगला पडलं महागात!

‘राजीव गांधींप्रमाणे क्रांती करण्यासाठी ते खातं…’; उद्धव ठाकरेंचा खुलासा

“बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More