मनोरा आमदार निवासात छत कोसळल्यानं खळबळ

मुंबई | मनोरा आमदार निवासात छत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील सिलींगचं छत कोसळलं.

छत कोसळलं त्यावेळी खोलीमध्ये कोणीच नव्हतं. खोली उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

दरम्यान, २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचा दर्जा अत्यंत खराब असल्याचा अहवाल इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला होता. दरम्यान, या इमारती पाडून इथं नवीन आमदार निवास बांधण्यात येणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या