Mumbai l मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे तब्बल 63 तास बंद राहणार आहे, त्यामुळे मुंबैकरणाची चांगलीच तारांबळ उडणार आहे. मध्य रेल्वेने आज मध्यरात्री म्हणजेच शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून महा मेगाब्लॉक बसवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही तास त्रास सहन करावा लागणार आहे.
पुढील काही तास रेल्वेने प्रवास टाळण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन :
मध्य रेल्वेने मेगाब्लॉक बडवायला सुरवात केली आहे. त्यानुसार हा मेगाब्लॉक रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे या दिवसांत काही महत्वाची कामे नसतील तर रेल्वेने प्रवास करणे टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाची लांबी देखील वाढवण्यात येणार आहे.
तसेच ठाणे स्थानकावरील 5 आणि 6 फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. या ब्लॉक दरम्यान तब्बल 930 लोकल गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. याशिवाय 72 एक्स्प्रेस देखील रद्द केल्या आहेत.
Mumbai l कंपन्यांचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिले ‘वर्क फॉम होम’ :
मध्य रेल्वे लोकलच्या एकूण तब्बल 930 फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी 161, शनिवारी 534, रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचं सांगितलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक असून आवश्यकता असल्यास रेल्वेचा प्रवास कराव असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेने प्रवास टाळण्याचे आवाहन दिल्यानंतर मुंबईतील अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉम होम’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय दुसरीकडे ज्या कंपन्यांनी सुट्टी दिल्या नाही किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी हे रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे.
News Title – Mumbai Central Railways 63 Hour Mega Block 930 Local Cancelled
महत्त्वाच्या बातम्या
आज या राशीच्या व्यक्तींना धन प्राप्तीचे योग जुळून येतील
सौरव गांगुलीचा गौतम गंभीरला विरोध?; सौरव गांगुलीच्या पोस्टने खळबळ
अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…
बाप, आज्यानंतर आता आईही अडचणीत; आईच्या रक्ताची चाचणी होणार
‘गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’; अजित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर