मुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं; आठवलेंची मागणी

मुंबई | मुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

मुंबई ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे, बऱ्याच काळ ते मुंबईत वास्तव्यास होते. मुंबईत त्यांच्या अनेक आठवणी आहेत, म्हणून मुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी आंबेडकर जनतेची मागणी आहे, असं आठवलेंनी सांगितलं.

दरम्यान, या मागणीसाठी आपण रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असंही आठवलेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप सत्तेत आल्यास 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करु, आश्वासनाचं काय झालं?

-#MeToo | मराठीत Black Rose चळवळ

-सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं; संघाचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला

-#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी

-राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा… सत्यजित तांबे!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या