Top News मुंबई

मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबई | मुंबई सेंट्रलच्या नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये काल रात्री 9 च्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या तब्बल 11 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अजूनही या मॉलला लागलेली आग नियंत्रणात आलेली नाही. मॉलच्या नजीक असलेल्या आॅर्किड एवकेव्ह इमारतीतील 3500 हून अधिक लोकांची सुटका करण्यात आलीये. दरम्यान आग विझवताना अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी जखमी झालेत.

सिटी सेंटर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या, 5 पाण्याचे टँकर, 6 रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध आहेत. ही आग लेवल 5 ची असून विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

…म्हणून वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसेही भाजपला ठोकणार रामराम!

“पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका”

‘जर मला मोदींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर…’; सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या