मुंबई | मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पहायला मिळतंय. तर आज तिसऱ्या दिवशी देखील मुंबईमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही दिसून येतोय.
दरम्यान आज देखील या ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. गेले दोन दिवस मुंबईत काहीश्या प्रमाणात झालेल्या पावसाने तापमानात कमालीची घट झालीये. दरम्यान मुंबईकरांना सोमवानंतर मोकळ्या आकाशासह सूर्यांचं दर्शन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, पुढील 2-3 दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येतील.
दरम्यान, पुढील 4-5 दिवस मध्य प्रदेश, विदर्भ तसंच छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये.
थोडक्यात बातम्या –
शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं; प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
फेक टीआरपीप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; रिपब्लिक चॅनेलच्या ‘या’ व्यक्तीला अटक
होय, मी घरी बसून काम करत होतो, म्हणूनच….; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
“लव्ह जिहादच्या नावाखाली परदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावतात बोली”
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात केक खाण्यासाठी उडाली झुंबड; पाहा व्हिडीयो