मुंबई कोस्टल रोडवर सावधान! वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Coastal Road

Coastal Road l मुंबईतील कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत तब्बल २,९६४ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. अतिवेगाने वाहन चालवल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते.

अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई :

मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून कोस्टल रोड सुरू करण्यात आला असला तरी, येथे वाहतूक नियम तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत स्पीडगन आणि कॅमेऱ्याच्या मदतीने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हजारो वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोस्टल रोडवरील वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वरळी, ताडदेव आणि वांद्रे वाहतूक विभागाच्या पोलिसांची नियुक्ती कोस्टल रोडवर करण्यात आली आहे. तसेच, वांद्रे रेक्लमेशन परिसरात विशेष नाकाबंदी केली जात असून रेसिंग, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार आणि कस्टमाइज्ड वाहनांवर कठोर कारवाई केली जात आहे.

Coastal Road l स्वयंचलित कॅमेऱ्यांच्या मदतीने कारवाई :

कोस्टल रोडवर सुरक्षिततेसाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख कॅमेरे बसवले जात आहेत, जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद करतील. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर स्पीड लिमिट ओलांडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाईल.

अलीकडेच कोस्टल रोडवर एका भरधाव कारने रस्त्याच्या भींतीला जोरदार धडक दिली होती. या घटनेनंतर वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. या अंतर्गत वाहनचालकांचे लायसन्स रद्द करून संबंधित गाडी जप्त करण्यात आली. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी थेट दंड आणि वाहन जप्तीची कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.

अतिवेगाने वाहन चालवणे हा गुन्हा असून यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड आकारला जात आहे. कोस्टल रोडवरील वाहतूक नियमांचे पालन न केल्यास हजारो रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

SEO Title: Mumbai coastal road news

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .