Top News

काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!

मुंबई |  ऐन लोकसभा निवडणुक तोंडावर आलेली असताना मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक कदाचित लढणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडचा भाग राहिलेले खासदार मिलिंद देवरा यांनी केलं आहे.

मुंबई काँग्रेसमधले प्रॉब्लेम्स आता काही गुपित राहिलेले नाहीत, असं म्हणत त्यांनी काँग्रेसमध्ये सगळ काही आलबेल नाही असंच दाखवून दिलंय.

मिलिंद देवरा आणि संजय निरूपम यांच्यामध्ये मुंबई काँग्रेस शहराध्यक्ष पदावरून वाद होते. त्यानंतर संजय निरूपम यांनी बाजी मारत मुंबई काँग्रेस शहराध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले.

मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचं मला वाईट वाटतंय. आज अनेक काँग्रेस नेते घरी बसून आहेत. याबाबतची सगळी परिस्थिती मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना कळवली आहे, असंही देवरा यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक! भाजपला शह देण्यासाठी प्रशांत किशोरांना घेतलं ताफ्यात

“स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार, तरीही तो घेऊन लोकं प. बंगाल येतात”

महाआघाडीतून राज ठाकरे आऊट?? अशोक चव्हाणांचा ‘मनसे’ला जोरदार विरोध

अक्षय कुमार आणि मी एकत्र काम करणं अशक्य- शाहरूख खान

विराट कोहली पण होईल कन्फ्यूज! नेमकी ‘ही’ माझी का ‘ती’ माझी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या