Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिका निवडणुक लढण्याबाबत अध्यक्ष भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

मुंबई | काही दिवसांवर आता मुंबई महानगरपालिका निवडणुक आली आहे. भाजपला महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेत आपली ताकद दाखवुन दिली. मात्र महाविकास आघाडी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार का?, याबाबत तिन्ही पक्षांनी आपलं अद्याप मत सांगितल नव्हत. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडलेल्या भाई जगताप यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 227 जागा स्वबळावर लढवाव्यात असं म्हणत भाई जगतापांनी स्वबळाचा नारा दिला आहे. पुण्यात ते बोलत होते.

मुंबई महापालिकेत एक वेळ होती ज्यावेळी काँग्रेसचे 75 नगरसेवक होते. मात्र मागील 10 वर्षांमध्ये ही संख्या 30 ते 35 वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पुर्ण ताकदीने तयारी करणार असल्याचं भाई जगताप म्हणाले.

दरम्यान, हापालिका निवडणुकांसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचं जगतापांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“…मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच”

माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकरे

‘संतोष पोळने माझ्यासमोर….’; माफीची साक्षीदार ज्योती मांढरेची कोर्टात साक्ष

सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या