बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचं ठरलं… कोरोनासोबत जगायचं! कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरु पण लोकांना प्रवेशासाठी ‘ही’ अट

मुंबई | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दादर येथील टिळक भवन हे कार्यालय आजपासून पुन्हा सुरु करण्यात आले असून शासनाच्या नियमानुसार 10 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात असेल. या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या तसेच अभ्यंगतांना अपॉईंटमेंट घेऊनच प्रवेश देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत, असं महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष कानडे, सरचिटणीस राजन भोसले, सरचिटणीस व प्रवक्ते राजेश शर्मा, सरचिटणीस यशवंत हाप्पे, सचिव राजाराम देशमुख, कार्यालय अधिक्षक नामदेव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थितही होते.

दोन महिन्यांचा काळ मोठ्या संकटाचा होता, या काळात सर्वांनी धैर्याने काम केले. लॉकडाऊन असल्यामुळे या काळात पक्ष कार्यालय बंद ठेवण्यात आले होते परंतु पक्षाचे काम मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरुच होते. या गंभीर संकटाच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन गरजू लोक, कामगार, गरिब, लोकांना मोठ्या प्रमाणात मदत केली. अन्नधान्य, रेशन, औषधे, सॅनिटाईझर, मास्क याची मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी मेहनत घेतली आहे, असं थोरात यावेळी म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळाचा इशारा मिळताच राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या होत्या, एनडीआरएफची पथके कोकण, पालघर भागात तैनात करण्यात आली होती. किनारपट्टीवरील लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. परंतु निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणांना तातडीने आदेश देऊन वीज पुरवठा सुरळित करणे, रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तसेच घरांची पडझड, शेतमालाचे नुकसान यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले असून आज हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. बहुतांश भागातील पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून श्रीवर्धन, मुरुड या जास्त नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्यांचे कामही लवकरच पूर्ण होईल, असंही थोरात यांनी यावेळी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, प्रकाश आंबेडकर यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता गायीची मदत, अमेरिकन कंपनीनं केला ‘हा’ मोठा दावा

राज्यात 2553 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती…

कोरोनाचे रूग्ण वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची राज्याला मोठी गुडन्यूज…!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More