बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची  आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 794 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 833 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 16 हजार 070 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 95 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 78 हजार 278 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत  आहे. मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

आनंदाची बातमी! पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

खुशखबर! अनलिमिटेड इंटरनेट पॅकसाठी ‘ही’ महापालिका चक्क विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार 1 हजार रुपये

मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संशयी प्रवृत्ती बळावल्या 5 महिन्यात तब्बल एवढ्या तक्रारी

नागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील ‘या’ राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More