बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु, हळूहळू मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हजारांच्या आत आल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

काल मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये फक्त 575  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज हजारांच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 718 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 6 लाख 84 हजार 825 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 15 हजार 390 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनामुक्तीचा दर हा 95% असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हळूहळू मुंबईसह एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

गजा मारणेवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारलं

अशी असेल मराठा क्रांती मुक आंदोलनाची रूपरेषा; वाचा सविस्तर माहिती

बँकेच्या 650 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडुन अटक

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली, पण सक्रिय रुग्णसंख्येत घट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More