बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 373 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 543 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच रुग्णसंख्येतील चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,51,181 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4853 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,184 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,27,627 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थो़डक्यात बातम्या-

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“वीर सावरकरांच्या नावानं राजकारण आणि आज सत्तेसाठी आंधळेपणा”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश

अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर

आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More