बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होतेय घट

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. परंतु, हळूहळू मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हजारांच्या आत आल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

काल मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये फक्त 700 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज हजारांच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 704 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 6 लाख 83 हजार 382 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 15 हजार 773 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनामुक्तीचा दर हा 95% असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हळूहळू मुंबईसह एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

खतरनाक! तरूणाने घरी बनवला बॉम्ब, निकामी न करता आल्याने गेला पोलिसांत अन्…

धक्कादायक! म्हणूनच मुंबईकरांना वाटते पावसाची भीती?; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

ब्युटी क्वीनने प्रेमाचं नाटक करत बनवला पॉर्न व्हिडीओ त्यानंतर केलं हे घृणास्पद कृत्य

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More