बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत चढउतार सुरूच, वाचा आकडेवारी

मुंबई | मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 217 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 247 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात 4 जणांनी प्राण गमावला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,62,616 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 2218 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,41,500 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

ओमिक्राॅन कोरोना व्हेरिएंटबाबत केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी

भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदूंशिवाय भारत नाही – सरसंघचालक मोहन भागवत

परळीनंतर आता ‘या’ देवस्थानालाही बॉम्बने उडविण्याची धमकी

भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही…

“उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, केंद्राची कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More