बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने अधिक

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत होतं. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होती. पण आता ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 हजार 350 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, तब्बल 4 हजार 565 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर हा 93 टक्क्यावर असल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 29 हजार 643 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने मुंबई लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

काल मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 57 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 6 लाख 46 हजार 163 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबई महापालिकेकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली असून लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना रोखण्यासाठी 7 लाखांची पुजा, खंडीभर बोकडांचे बळी अन्…

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

आमच्या मागे ईडी आली तर खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळतील- गिरीश बापट

‘…तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More