बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहराची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 94 टक्यांवर

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट घोंगावत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची मंगळवारची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याने दिलासादायक वातावरण पसरलं आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी एकूण 1 हजार 037 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासात 1 हजार 427 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मंगळवारी आलेली आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या मुंबईत 27  हजार 649 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 94 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण 6 लाख 55 हजार 425 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत असताना पाहायला मिळत असल्याने लवकरच मुंबई कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

यास चक्रीवादळाचं कव्हरेज करताना महिला पत्रकार ढसा ढसा रडली, पाहा व्हिडीओ

शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; तरूणाला लोखंडी राॅडने मारहाण

मुलगी जवळ येताच गाढवानं केलं असं काही की ते पाहून तुम्हीही चकित व्हाल, पाहा व्हिडीओ

बायकोच्या मैत्रीणीच्या प्रेमात आकंठ बुडाला; त्यानंतर त्याने जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More