मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची कालची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काल 24 तासात एकूण 1 हजार 946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 2 हजार 037 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात दिलासादायक असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 38 हजार 649 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 92 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 29 हजार 410 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.
रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसात कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
महाविकास आघाडीत बिघाडी?; राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी खडाजंगी
“पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?”
ऐकावं ते नवलंच! लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी पठ्ठ्याने पळवली बस, अन्….
विनापास गोव्याला चाललेल्या पृथ्वीला पोलिसांनी पकडलं, पाहा पुढे काय घडलं!
आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त
Comments are closed.