महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

मुंबई | मुंबईत असलेले दररोज 6.62 टक्के रुग्णवाढीचे प्रमाण आता 3.50 टक्क्यांवर आले आहे. ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण दहा टक्क्यांवरुन 1.6 ते 2.4 टक्के इतका खाली आला आहे.

मुंबईत मे महिन्यात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे मुंबईतील विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत असल्याने पालिकेने अधिक उपाययोजना राबण्यात सुरुवात केली होती.

सद्यस्थितीत वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, सायन, सांताक्रुझ, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्णवाढ कमी होत चालली आहे.

सध्या धारावी, दादर, माहिम या भागांतील रुग्णवाढीचा दर 2.4 टक्के इतका खाली आला आहे. या भागांत आतापर्यंत मुंबईतील पालिकेच्या सर्व विभागांच्या तुलनेत कोरोनाचे सर्वाधिक 3200 रुग्ण सापडले आहेत. पण आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

‘निसर्ग’ आपत्तीत ठाकरे सरकार जनतेच्या पाठीशी- अजित पवार

पुण्यालगत असणाऱ्या ‘या’ 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द

राज्यात आज तब्बल 2234 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा तुमच्या भागात किती नव्या रूग्णांची नोंद…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या