बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईची कोरोना रूग्णसंख्या आली आटोेक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोना महामारीचं संकट घोंगावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात एकूण 346 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकूण 444 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी काहिशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 4 हजार 972 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकूच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत होती. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्या मागच्या काही दिवसात हळूहळू कमी झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रवादीचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

15 टक्के फी कपातीविरोधात खासगी शाळा आक्रमक; सरकारला दिला ‘हा’ इशारा

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना… – नाना पटोले

“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; शिवसैनिक कधीच माजी होत नाही”

दादर रेल्वे स्थानकावर अचानक तरूणाने मारली महिलेला मिठी अन् पुढे घडला ‘हा’ प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More